भजनी मालिका

भजने

आम्हांसे तो पुरे विठ्ठलाची एक । वाउगाची देखा दुजा न मनीं ॥१॥ ध्यानीं धरुं विठ्ठल करुं तयाचें कीर्तन । आणिक चिंतन नाहीं दुजें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आम्हीं असतां माजघरीं । रात्र झाली दोन प्रहरीं । मी असतां पतिशेजारीं । अवचित हरी तुझा आला ॥१॥ काय संगु सखये बाई । वेदशास्त्रां अगम्य पाहीं । आगमनिगमां न कळे कांहीं । मन पवन पांगुळलें गे बाई ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आम्ही असों निंश्चितीनें । एक्या गुणें तुमचिया ॥१॥ दुराचारी तरले नामें । घेतां प्रेम म्हणोनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही आइते जेवणार । न लगे सोसावे डोंगर । सुखाचा वेव्हार । तेणें चि वाढलें ॥१॥ ठेवा जोडला मिरासी । ठाव झाला पायांपासी । नव्हे आणिकांसी । रीघ तेथें यावया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही आणि संत संत आणि आम्ही । सूर्य आणि रश्मि काय दोन ॥१॥ दीप आणि सारंग सारंग आणि दीप । ध्यान आणि जप काय दोन ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आम्ही आणि संत संत आणि आम्ही सूर्य आणि रश्मि काय दोन ॥१॥ दीप आणि सारंग सारंग आणि दीप ध्यान आणि जप काय दोन || २ ||

रचनाकार: संत जनाबाई

आम्हीं कापडीरे आम्ही कापडीरे । पापें बारा ताटा पळती बापडिरे ॥१॥ पंढरपुरीचे कापडिरे । उत्तरपंथीचे कापडिरे ॥२॥

आम्ही काय कुणाचें खातो तो राम आम्हांला देतो बांधिले घुमट किल्ल्याचे तट । तयाला फुटती पिंपळवट नाहीं विहीर आणि मोट ।

रचनाकार: संत रामदास

आम्ही काय जाणो तुझा अंत पार । होसी तूं साचार निवारिता ॥१॥ बहु अपराधी जाण यातिहीन । पतितपावन पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आम्ही काय जाणों तुझा अंतपार । होसी निरंतर निवारिता ॥१॥ बहु अपराधी जाणा यातिहीन । पतितपावना तुम्ही देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आम्ही कोणावरी सत्ता । करावी बा पंढरीनाथा । होईल साहाता दुजा । तत्त्वता तो सांगा ॥१॥ तूंचि बळिया शिरोमणि । आहेसि या त्रिभुवनीं । देवाधिदेव मुगुटमणि । कींव भाकणें यासाठीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आम्ही क्षेत्रींचे संन्यासी । देहभरित हृषीकेशी । नाहीं केली ऐशी । आशाकामबोहरी ॥१॥ आलें अयाचित अंगा । सहज तें आम्हां भागा । दाता पांडुरंगा । ऐसा करितां निंश्चिती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही घ्यावे तुझे नाम । तुम्ही आम्हां द्यावे प्रमे॥१॥ ऐसे निवडिले मुळी । संतीं बैसोनि सकळीं ॥ध्रु

रचनाकार: संत तुकाराम