भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही गोवळीं रानटें । नव्हों जनांतील धीटें

amhi govalin ranaten | navhon janantil dhiten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही गोवळीं रानटें । नव्हों जनांतील धीटें ॥१॥ सिदोरीचा करूं काला । एक वांटितों एकाला ॥ध्रु.॥ खेळों आपआपणांशीं । आमचीं तीं आम्हांपाशीं ॥२॥ म्हणे मिळाले नेणते । तुका कान्होबा भोंवते ॥३॥