भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही आणि संत संत आणि आम्ही । सूर्य आणि रश्मि काय दोन

amhi ani sant sant ani amhi | surya ani rashmi kay don

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आम्ही आणि संत संत आणि आम्ही । सूर्य आणि रश्मि काय दोन ॥१॥ दीप आणि सारंग सारंग आणि दीप । ध्यान आणि जप काय दोन ॥२॥ शांति आणि विरक्ति विरक्ति आणि शांती । समाधान तृप्ति काय दोन ॥३॥ रोग आणि व्याधी व्याधी आणि रोग । देह आणि अंग काय दोन ॥४॥ कान आणि श्रोत्न श्रोत्र आणि कान । यश आणि मान काय दोन ॥५॥ देव आणि संत संत आणि देव । म्हणे जनी भाव के ऐसा ॥६॥