भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही आणि संत संत आणि आम्ही सूर्य आणि रश्मि काय दोन

amhi ani sant sant ani amhi surya ani rashmi kay don

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आम्ही आणि संत संत आणि आम्ही सूर्य आणि रश्मि काय दोन ॥१॥ दीप आणि सारंग सारंग आणि दीप ध्यान आणि जप काय दोन || २ || शांति आणि विरक्ति विरक्ति आणि शांति। समाधान काय तृप्ति दोन ||३|| रोग आणि व्याधी व्याधी आणि रोग। देह आणि अंग काय दोन ||४|| कान आणि श्रोत्र श्रोत्र आणि कान यश आणि मान काय दोन ॥५॥ देव आणि संत संत आणि देव म्हणे जनी भाव एक ऐसा ||६||