भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही काय जाणो तुझा अंत पार । होसी तूं साचार निवारिता

amhi kay jano tujha ant par | hosi tun sachar nivarita

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आम्ही काय जाणो तुझा अंत पार । होसी तूं साचार निवारिता ॥१॥ बहु अपराधी जाण यातिहीन । पतितपावन पांडुरंगा ॥२॥ नामा म्हणे ऐसा पाताकी पामर । करिसी उद्धार साच ब्रीद ॥३॥