भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही आइते जेवणार । न लगे सोसावे डोंगर । सुखाचा वेव्हार । तेणें चि वाढलें

amhi aite jevanar | na lage sosave dongar | sukhacha vevhar | tenen chi vadhalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही आइते जेवणार । न लगे सोसावे डोंगर । सुखाचा वेव्हार । तेणें चि वाढलें ॥१॥ ठेवा जोडला मिरासी । ठाव झाला पायांपासी । नव्हे आणिकांसी । रीघ तेथें यावया ॥ध्रु.॥ बळी दिला जीवभाव । नेणें आणिकांचे नांव । धरिला एक भाव । तो विश्वास फळला ॥२॥ तुका म्हणे झालों बळी । आम्ही निकट जवळी । बोलिलों तें पाळीं । वचन स्वामी आमुचें ॥३॥