भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही असों निंश्चितीनें । एक्या गुणें तुमचिया

amhi ason ninshchitinen | ekya gunen tumachiya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही असों निंश्चितीनें । एक्या गुणें तुमचिया ॥१॥ दुराचारी तरले नामें । घेतां प्रेम म्हणोनि ॥ध्रु.॥ नाहीं तुम्हां धांव घेता । कृपावंता आळस ॥२॥ तुका म्हणे विसरूं कांहीं । तुज वो आई विठ्ठले ॥३॥