भजनी मालिका

भजने

साकरेचें नाम घेतां कळे गोडी । तैसी आम्हां जोडी वैष्णवांची ॥१॥ मोक्ष गांठी असे ठेविला बांधोनी । सोस तो भजनीं आवडीचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

साक्षीभूत आत्मा म्हणती आहे देही । वायां कां विदेही जाहला मग ॥१॥ नानामतें तर्क करितां विचार । पापांचे डोंगर अनायासें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सांखिळलों प्रीती गळां । भुंके वेळा जाणोनियां॥१॥ तुमचें मी केशीराजा । सुनें या काजा पाळिलों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सांगतां आतां न वाटे खरें । भोगितां बरें जाणवेल ॥१॥ तेव्हां कोणी न ये कामा । हिरोनी श्रमा घ्यावया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सांगतां ते खुण न बिंबे पोटीं । वायां आटाआटीं करुनी काय ॥१॥ जो गुरुचें दास पुर्ण अधिकारी । ब्रह्माज्ञानी सारा तया लोभे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सांगतां दुर्लभ ज्ञानाचिया गोष्टी । अनुभव तो पोटीं कैचा घडे ॥१॥ भजनाचे सोई जगा परिहार । नेणत्यां सादर चित्त कथे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सांगतां महिमा पंढरीचा । अपार वाचा वेदांचिये ॥१॥ सहजचि क्षेत्रा जाईन म्हणतां । धांवे सायुज्यता सामोरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा