भजनी मालिका
← भजनांकडे परत

साकरेच्या योगें वर्ख । राजा कागदातें देखे

sakarechya yogen varkha | raja kagadaten dekhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साकरेच्या योगें वर्ख । राजा कागदातें देखे ॥१॥ तैसें आम्हां मानुसपण । रामनाम केण्यागुणें ॥ध्रु.॥ फिरंगीच्या योगें करी । राजा काष्ठ हातीं धरी ॥२॥ रत्नकनका योगें लाख । कंठीं धरिती श्रीमंत लोक ॥३॥ देवा देवपाट देव्हा । †यावरी बैसे स्पष्ट॥४॥ ब्रह्मानंदयोगें तुका । पढीयंता जन लोकां ॥५॥