भजनी मालिका
← भजनांकडे परत

साखरेचा ऊंस जरी होय पुढती

sakharecha uns jari hoy pudhati

साखरेचा ऊंस जरी होय पुढती । मथितां घृतीं काय क्षीर निवडे ॥१॥ माघारे जीवन जरी वाहे सरिता । तरिच जन्मां येती हरिचे दास ॥२॥ विविधा मति भक्ति जे करिती । ते अंती नव्हती संसार बापा ॥३॥ कापुराचे मसि जरी लिहिजे लिखित । जरि छाये पडे हात प्रकृतीचे ॥४॥ पवना पाठीं पांगुळें लागती । तैं जन्मा येति हरिचे दास ॥५॥ संत वैष्णव हरिदासा जे नर निंदिती । आणि नमनिती ते वरपडे होती प्रेम किंकर ॥६॥ निवृत्तिदास म्हणे विव्हळी जे भजती । ते जन्मा न येती भाक माझी ॥७॥