भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगतातील दाया । तुम्हां पुत्र झाला राया

sangatatil daya | tumhan putra jhala raya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सांगतातील दाया । तुम्हां पुत्र झाला राया ॥१॥ ऐक-तांचि ऐसें कानीं । हर्ष न समाये मनीं ॥२॥ उठा उठा हो त्वरेंसी । पाचारावें वसिष्ठासी ॥३॥ ब्राह्मणासी पाचारा । सांगा सर्व नारी-भरा ॥४॥ फोडा फोडारे भांडारें । आणवा गाईचीं खिल्लारें ॥५॥ उभवा उभवारे गुढी । सोडा वस्रांचीं गाठोडीं ॥६॥ झाडोनियां टाका खडे । घाला केशराचे सडे ॥७॥ नामा ह्मणे भूमंडळा । स्वामि माझा पहा डोळा ॥८॥