भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगतां ते खुण न बिंबे पोटीं । वायां आटाआटीं करुनी काय

sangatan te khun na bimbe potin | vayan ataatin karuni kay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांगतां ते खुण न बिंबे पोटीं । वायां आटाआटीं करुनी काय ॥१॥ जो गुरुचें दास पुर्ण अधिकारी । ब्रह्माज्ञानी सारा तया लोभे ॥२॥ अभ्यास पुर्वीच्या पुण्य लेश जन्माचा । तैं ब्रह्माज्ञानाचा लाभ होय ॥३॥ एक जनार्दनीं पुर्ण कृपा होतां । सहज सायुज्यता पाठीं लागें ॥४॥