भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगतां हें नये सुख । कीर्ती मुख न पुरे

sangatan hen naye sukh | kirti mukh na pure

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांगतां हें नये सुख । कीर्ती मुख न पुरे ॥१॥ आवडीनें सेवन करू । जीवींचें धरूं जीवीं च ॥ध्रु.॥ उपमा या देतां लाभा । काशा शोभा सारिखी ॥२॥ तुका म्हणे नुचलीं डोई । ठेविली पायीं संतांचे ॥३॥