भजनी मालिका

भजने

संगें वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हें जन बहु देवा ॥१॥ याचि दुःखें या जनाचा कांटाळा । दिसताती डोळां नानाछंद ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊं नेणे वांयां पेरि त्याचें ॥१॥ त्याचिया पिकासि आलिया घुमरी । आल्या गाईंवरी आणिक गाईं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

संचित प्रारब्ध क्रियमाण । न सुटे प्रणियां भोगिल्याविण । यालागीं करावें हरीचें स्मरण । तुटेल बंधन मग त्यांचे ॥१॥ सतकर्म करितां विधियुक्त । माजी निषेधाचा पडे आघात । सांग अथवा व्यंग होत । होय तें संचित निश्चयेंसी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सचेतनी द्वेष अचेतनीं पूजा । भक्ति गरुडध्वजा केवीं पावे ॥१॥ व्यर्थ खटाटोप नाथिला पसारा । गोविंद गव्हारा केवीं कळे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥१॥ एक गुण तो केला दोंठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संत आणि देव मानी जो वेगळे । तेणें येथें आगळे केले दोष ।।१।। माता ते वेगळी कुच ते उरींचे। म्हणोनियां त्याचें मर्दन करी ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

संत आणि देव मानी जो वेगळे । तेणें येथें आगळे केले दोष ॥१॥ माता ते वेगळी कुच तें आगळें । म्हणोनि गरळें पितो मद ॥३॥

रचनाकार: संत नामदेव

संत आमुचे देव संत आमुचें भाव । आमुचें गौरव संत सर्व ॥१॥ वेदशास्त्रा पुराण मंत्रादि साधन । संतसेवा ध्यान आम्हां धन्य ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ