भजनी मालिका
← भजनांकडे परत

सचेतनी द्वेष अचेतनीं पूजा । भक्ति गरुडध्वजा केवीं पावे

sachetani dvesh achetanin puja | bhakti garudadhvaja kevin pave

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सचेतनी द्वेष अचेतनीं पूजा । भक्ति गरुडध्वजा केवीं पावे ॥१॥ व्यर्थ खटाटोप नाथिला पसारा । गोविंद गव्हारा केवीं कळे ॥२॥ हरिदासाचेनि गुणें शिळा दैवतपणें । त्या शिळा पुजोनि त्याचें द्वेषा ॥३॥ एका जनार्दनीं नाथिलाची दावी । सजीव निर्जिवों गोंवियेलें ॥४॥