भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत आणि देव मानी जो वेगळे । तेणें येथें आगळे केले दोष

sant ani dev mani jo vegale | tenen yethen agale kele dosh

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
संत आणि देव मानी जो वेगळे । तेणें येथें आगळे केले दोष ।।१।। माता ते वेगळी कुच ते उरींचे। म्हणोनियां त्याचें मर्दन करी ॥२॥ पाप तें वेगळें पुण्य तें आगळें म्हणोनी गरळें पितो मद ।। ३ ।। दिवस उगवतां पाहों नये त्यातें। जेणें हो संतांतें द्वेषियेलें ||४|| तयाचा विटाळ वाहे रजस्वला म्हणे जनी चांडाळा बोलावू नका ॥५॥