भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत आज्ञा सादवित । जातों सकळांचेंहि हित

sant adnya sadavit | jaton sakalanchenhi hit

रचनाकार: संत निळोबा · अभंग
संत आज्ञा सादवित । जातों सकळांचेंहि हित ॥१॥ नाईकोनी सोडाल । फळ कनिष्ठ तरी पाबाल ॥२॥ आम्ही उत्तीर्ण आपुलिया । उचिता ठेलों सांगोनियां ॥३॥ निळा म्हणे यावरी आतां । बोल न ठेवावा मागुता ॥४॥