भजनी मालिका

भजने

मनोभाव जाणोनि माझा । सगुणरुप धरिलें वोजा । पाहुणा सदगुरुराजा । आला वो माय ॥१॥ प्रथम अंतःकरण जाण । चित्तःशुद्ध आणि मन । चोखाळोनी आसन । स्वामीसी केलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥१॥ रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

ममत तुटेना मज केशिराजा । अंगीं भाव दुजा लागे पाठीं ॥१॥ शरीरीं तितीक्षा नाहीं क्षमा शांति । यालागीं श्रीपति वायां गेलों ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मयुरध्वज राजा महापापी जाण । उभा नारायण जोडी हात ॥१॥ कर्वत आणसि सकळां देखतां । कांतिसी तत्वता मांस त्याचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मयूरादि पक्षी नृत्य करीताती । नद्या वाहताती दोहीं थडया ॥१॥ भूमीवरी सडे केशर कस्तुरी । आनंद अंतरीं सक-ळांच्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मरण सांगा स्वामी कवणियां गुणें । संसारीं मरण उरलें नाहीं ॥१॥ आम्हां मरण नाहीं मेलें होतें काई । श्रीगुरुच्या पायीं राहे मना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मरणापाठीं जन्म जन्मापाठीं मरण । ही शिदोरी जाण पडती पदरीं ॥१॥ शतवर्ष कराल घेतां वाते गोड । कर्माकर्म सुघड न कळे कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मरणाही आधीं राहिलों मरोनी । मग केलें मनीं होतें तैसें ॥१॥ आतां तुम्ही पाहा आमुचें नवल । नका वेचूं बोल वांयांविण ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मरणें पेरणें जन्म उगवणें । मायेची ते खूण सांगितली ॥१॥ संग तुझा पुरे संग तुझा पुरे । संग तुझा पुरे नारायणा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव