भजनी मालिका
← भजनांकडे परत

ममता पुसे सये जिवशिवा ठाव

mamata puse saye jivashiva thav

ममता पुसे सये जिवशिवा ठाव । पूर्णता पान्हाये कोणे घरीं ॥१॥ ऐके सखिये पुससी बाईये । परब्रह्म सामाये पुंडलिका ॥२॥ नाहीं यासी ठावो संसार पै वावो । एकतत्त्वीं रावो घरीं वसे ॥३॥ बापरखुमादेविवरु उदार वोळला । विश्वजनपाळा ब्रीद साजे ॥४॥