भजनी मालिका
← भजनांकडे परत

ममत तुटेना मज केशिराजा । अंगीं भाव दुजा लागे पाठीं

mamat tutena maj keshiraja | angin bhav duja lage pathin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ममत तुटेना मज केशिराजा । अंगीं भाव दुजा लागे पाठीं ॥१॥ शरीरीं तितीक्षा नाहीं क्षमा शांति । यालागीं श्रीपति वायां गेलों ॥२॥ नामा म्हणे देवा तारिसी पतिता । म्हणोनियां सत्ता केली आम्हीं ॥३॥