भजनी मालिका
← भजनांकडे परत

मरण सांगा स्वामी कवणियां गुणें । संसारीं मरण उरलें नाहीं

maran sanga svami kavaniyan gunen | sansarin maran uralen nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मरण सांगा स्वामी कवणियां गुणें । संसारीं मरण उरलें नाहीं ॥१॥ आम्हां मरण नाहीं मेलें होतें काई । श्रीगुरुच्या पायीं राहे मना ॥२॥ मरणें हें काया मरणें हें माया । मरे हे छाया कवण्या गुणें ॥३॥ भक्ति अमरकंदु रामनाम वंदूं । नामयासी छंदू विठोबाचा ॥४॥