भजनी मालिका
← भजनांकडे परत

मरणापाठीं जन्म जन्मापाठीं मरण । ही शिदोरी जाण पडती पदरीं

maranapathin janma janmapathin maran | hi shidori jan padati padarin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मरणापाठीं जन्म जन्मापाठीं मरण । ही शिदोरी जाण पडती पदरीं ॥१॥ शतवर्ष कराल घेतां वाते गोड । कर्माकर्म सुघड न कळे कांहीं ॥२॥ मरणाची भ्रान्ती विसरुनी गूढ । वागवी काबाडे प्रपंचाचें ॥३॥ बाळ तरुणदशा वृद्धाप्य पावला । सवेंचि तो गेला अधोगती ॥४॥ एका जनार्दनीं मापाचिये परी । सवेंचि गोणी भरी सवें रिती ॥५॥