भजनी मालिका
← भजनांकडे परत

मरणें पेरणें जन्म उगवणें । मायेची ते खूण सांगितली

maranen peranen janma ugavanen | mayechi te khun sangitali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मरणें पेरणें जन्म उगवणें । मायेची ते खूण सांगितली ॥१॥ संग तुझा पुरे संग तुझा पुरे । संग तुझा पुरे नारायणा ॥२॥ तूं तरी न मरे मी तरी न पुरे । भक्ति हे संचरे हाचि लाभु ॥३॥ नामा म्हणे माझ्या ठायिंचा मी नेणें । संसार भोगणें तुझी जाला ॥४॥