भजनी मालिका
← भजनांकडे परत

मंबाजी गोसावी त्या स्थळीं नांदतां

mambaji gosavi tya sthalin nandatan

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
मंबाजी गोसावी त्या स्थळीं नांदतां । गृह प्रवेशतां देखियेले ॥ १ ॥ जाऊनी तयासी मागितलें स्थळ । तो अति चंचळ क्रोध तया ॥ २ ॥ मारावया उठे घातलें बाहेरी । आनंदें वो वरी प्रार्थियेलें ॥ ३ ॥ तेथें राहोनिया भोजनासी गेलों । बहुत पावलों समाधान ॥ ४ ॥ वृत्तान्त पुसीला कोठोनि आलांत । चालतसा पंथ कवण कार्या ॥ ५ ॥ कांहींबाही तया सांगितलें पूर्व । म्हणे रहा सर्व पर्वणीसी ॥ ६ ॥ सोमवरीं आहे अमावस्या पुढें । रहा भक्तिकोडें सुख घ्यावें ॥ ७ ॥ नित्य हरिकथा होतसें देऊळीं । तुकोबा माऊली वैष्णवीची ॥ ८ ॥ रहा येथें तुम्हां भक्षावया धान्य । देऊं हेंही पुण्य आम्हां घडे ॥ ९ ॥ बहिणी म्हणे मग राहिलों देहूस । धरूनी हव्यास तुकोबाचा ॥ १० ॥