भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंदवोवरी होती तये ठायीं

anandavovari hoti taye thayin

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
आनंदवोवरी होती तये ठायीं । वाटे तेथें कांहीं बसावेंसें ॥ १ ॥ करूनिया ध्यान लावावें लोचन । करावें स्मरण विठोबाचें ॥ २ ॥ तुकाराम तंव देखतां देखत । आले अकस्मात गुरुरूपें ॥ ३ ॥ बहिणी म्हणे तेथ पुसोनी मातेसी । क्रमियेल्या निशी तीन तेथं ॥ ४ ॥