भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंदे सद्‌गद जाहलीं इंद्रियें

anande sad‌gad jahalin indriyen

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
आनंदे सद्‌गद जाहलीं इंद्रियें । तुकारामपाय आठवले ॥ १ ॥ होऊनी सावध उघडिले नेत्र । आठवला मंत्र षडक्षरी ॥ २ ॥ ठसावला ध्यानीं मनाचिये ठायीं । आणिक काहीं आठवेना ॥ ३ ॥ बहिणी म्हणे हात घातला मस्तकीं । देह तो या लोकीं आढळेना ॥ ४ ॥