भजनी मालिका
← भजनांकडे परत

मयुरध्वज राजा महापापी जाण । उभा नारायण जोडी हात

mayuradhvaj raja mahapapi jan | ubha narayan jodi hat

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मयुरध्वज राजा महापापी जाण । उभा नारायण जोडी हात ॥१॥ कर्वत आणसि सकळां देखतां । कांतिसी तत्वता मांस त्याचें ॥२॥ कपोतणी मागें पारध्याचा वेष । दावी ह्रषिकेश रूप त्यासी ॥३॥ नामा म्हणे तुझें करणें उचित । कां मज प्रचित न ये देवा ॥४॥