भजनी मालिका
← भजनांकडे परत

मरण मारून मरा । भाई हो मरण मारून मरा

maran marun mara | bhai ho maran marun mara

रचनाकार: संत महंमद · अभंग
मरण मारून मरा । भाई हो मरण मारून मरा । सद्गुरुस्वामि सेउनि । आत्महित आधी करा ॥ १ ॥ कष्टि होऊनि कुडि पडे बापुडि । जिव हा पुट करि वेरझारा ॥छ ॥ मरतां कोण्ही न दिसे । जे सारा हाट गाडग्याचा फेरा ॥२॥ स्वप्निचि भावना । तैसे जीवीत्व जाणा । जना नको सो डंब अहंकारा । येम जेव्हां जीवा करिल यातना । तेव्हां काकुलति येसि गव्हारा ॥३॥ विजवट गहन । तैसे जन्म मरण । देहि या पाट जिवनि नितनोवरा । सदगुरु वचने मरण मारुनि उरा । सेख महमद विनिवितो योगेश्वरा ॥४॥