भजनी मालिका
← भजनांकडे परत

चहुं खाणी मधीं हरि धन्य भावां

chahun khani madhin hari dhanya bhavan

रचनाकार: संत महंमद · अभंग
चहुं खाणी मधीं हरि धन्य भावां ॥ निच भक्त तुझा सेवा करि ॥१॥ हरि उंच माझें ॥ निच तुझे तत्त्व तेणें वाढे तुझें महिमान ॥ २ ॥ हरि माझी धरणी ति तुझे पर्वत दिसे शोभिवंत ॥ माझ्याने तुझें ॥३॥ हरि तु माझा प्रजन्य ॥ मी तव तुझ्या नद्या । सिंधु जाल्या सुध्या मी तु तैस्या ॥४॥ हरि तु माझें राउळ ॥ मी सुधी केरसुणी । दरबार झाडुनि पडिलि आसे ॥५॥ हरि तुं माझा तरुवर । मी तुझें फुलफळ ॥ सोमति सकळ पत्रे खांद्या । ॥६॥ हरि तुं माझा सिउ । मी तवं तुझी शक्ति घरचार । हा व्यक्ति करूं दोधें ॥७॥ हरि सेख महमद दोना वाचा । भेद चाले आनादि सिध आणति साधु ॥८। हरि तुं माझी विहीर । ती तवं तुझी मोट चालतिल पाट ॥ पीकति मळे ॥९॥ हरि तु माझे आकाश । मी तवं तुझा नाद ॥ प्रगट हा शब्द माझ्याने तुझा ॥ १०॥ हरि तुं माझा वोंकार । आकारिं मकार ॥ मा चा ची विस्तार । माझा तुझा ॥११॥ हरि मी भक्त यारुप ? तुच माझा बाप । आयायमने छेप तुझांत माझी ॥ १२ ॥ हरि तुं माझी साकर । मी तवं तुझी गोडी । ऐसि वाढे प्रौढि । माझी तुझी ॥१३॥ हरि तु माझा समुद्र मी तव लवण । षड्रसे अन्न सरतें होये ॥१४॥ हरि तूं माझे रत्नः मी तो तुझा कीळ ॥ कोंदनि सुढाळ माझा तुझा ॥१५॥ हरि तु माझे मोती मी तो तुझें पाणी ॥ घट स्थानिं स्थानीं । तुझा माझा ॥१६॥ हरि तुं सरता । माझ्यानें अव्यक्ता । निर्गुणी हे वार्ता कोण जाणे ॥१७॥ हरि तुं तेल वाति मी तंव तुझा जयोति । नाहिं तरि भ्रांति आंधार खरा ॥ १८ ॥ हरि तूं माझें पोट । मी तंव तुझी कांठि । बघ वागवितो कंठिं नाम तुझे ॥१९॥ हरि माझें नासिक मि तव तुझा । उस्वास जपमाळ सुरस आर्धउर्ध ॥ २० ॥ हरि येकविस हजर । सा शतें आजप ।