भजनी मालिका

भजने

आजि सोनियाचा दिवस धन्य झाला । प्रत्यक्ष भेटला नामदेव ॥१॥ माझें मज दिलें माझें मज दिलें । माझें मज दिलें प्रेमसुख ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आजिचा दिवस आम्हां सोनियाचा । गोवळू भेटला कान्हो नंदाचा ॥१॥ कान्होबा पेंढारी येईल यमुने । तयावीण मज घडी न गमे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आजिचिया लाभें ब्रह्मांड ठेंगणें । सुखी झालें मन कल्पवेना ॥१॥ आर्तभूत माझा जीव जयांसाटीं । त्यांच्या झाल्या भेटी पायांसवें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आजिचें हें मज तुह्मीं कृपादान । दिलें संतजन मायबापीं ॥१॥ आलीं मुखावाटा अमृतवचनें । उत्तीर्ण तीं येणें नव्हे जन्में ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आजिवरी काळ वृथाचि गेला । जेथुनियां झाला सृष्टिक्रम ॥१॥ ऐसेचि नाना धरितां वेष । न तुटती पाश कर्माचे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आजिवरी तुम्हां आम्हां नेणपणे । कौतुकें खेळणें संग होता ॥१॥ आतां अनावर झालो अगुणाची । करूं नये तें चि करु सुखें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आजिवरी होतों तुझे सत्ते खालीं । तोंवरी त्वा केली विटंबणा ॥१॥ आतां तुज राहों नेदीं या देशांत । ऐसा म्यां समर्थ केला धणी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आजिवरी होतों संसाराचे हातीं । आतां ऐसें चित्तीं उपजलें ॥१॥ तुला शरणागत व्हावें नारायणा । अंगीकारा दिना आपुलिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आजी कांहो कृष्ण वर्जिली यमुना ।बाऊ तो जाणा कोठोनि आला ॥१॥ कैसा आहे बाहु पाहिन तयातें । म्हणोनि त्वरित उठिलासे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ