भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजि सोनियाचा दिवस धन्य झाला । प्रत्यक्ष भेटला नामदेव

aji soniyacha divas dhanya jhala | pratyaksha bhetala namadev

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आजि सोनियाचा दिवस धन्य झाला । प्रत्यक्ष भेटला नामदेव ॥१॥ माझें मज दिलें माझें मज दिलें । माझें मज दिलें प्रेमसुख ॥२॥ बहुत आटणी करितां दाटणी । सुखाचें सुख मनीं कोंदाटलें ॥३॥ माझा मज देव दावियेला देहीं । मी तूं पण गेलें ठाय़ींच्या ठायीं ॥४॥ चोखा म्हणे माझा जीवीचा विसावा । पोकरितों धांवा नामदेवा ॥५॥