भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजिचिया लाभें ब्रह्मांड ठेंगणें । सुखी झालें मन कल्पवेना

ajichiya labhen brahmand thenganen | sukhi jhalen man kalpavena

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आजिचिया लाभें ब्रह्मांड ठेंगणें । सुखी झालें मन कल्पवेना ॥१॥ आर्तभूत माझा जीव जयांसाटीं । त्यांच्या झाल्या भेटी पायांसवें ॥ध्रु.॥ वाटुली पाहातां सिणले नयन । बहु होतें मन आर्तभूत ॥२॥ माझ्या निरोपाचें आणिलें उत्तर । होईल समाचार सांगती तो ॥३॥ तुका म्हणे भेटी निवारला ताप । फळलें संकल्प संत आले ॥४॥