भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजी उत्तम सुदीन । झालें दरुशन संतांचें

aji uttam sudin | jhalen darushan santanchen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आजी उत्तम सुदीन । झालें दरुशन संतांचें ॥१॥ पापताप दैन्य गेलें । संत पाउलें पहातां ॥२॥ आवघा यत्न फळा आला । अवघा झाला आनंद ॥३॥ अवघें कर्म सुकर्म झालें । अवघे भेटले संतजन ॥४॥ एका जनार्दनीं बरा । संतसमागम खरा ॥५॥