भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजि सुखसमारंभ न देखे याचा

aji sukhasamarambh na dekhe yacha

रचनाकार: संत नागरी · अभंग
आजि सुखसमारंभ न देखे याचा । घरी जीवा जड भारी वाटे मज ।। दिंडी मखरे चौक रंगमाळा । न देणे सोहळा हरिकथेचा ॥१॥ तेणे माझा प्राण होये कासावीस । कां केले उदास पंढरीराया।।धृ।। न देणे उजवणी मंडपाचिये परी । तोरणे साजिरी शोभिवंते । जाई जुई चापे मोगरे सेवंती । गुंफिता न दिसती तुळसीमाळा ।।२।। न देखे स्वस्तिके सुरेखे गोमटी। रत्नदीप ताटी कुरवंडिया ।। मोरपिसा वेठी हिरे ढाळिती परवडी । न देखे देवती कृष्ण वरी ।।३।। सुकाचे मोइरे जिवलग सांगाती । हरिनामे गर्जती हरीचे दास ।। टाळ घोळ मांदल हालिया श्रूती । वाचता न दिसती आजि जेथे ॥ ४॥ कोण तयावीण आमुली पुरवील । माझ्या भेटवील पांडुरंगा।। प्राण जातो वेगी करा वो धावणी ।। देह टाकी धरणी हृदय पिटी ||५|| विठ्ठल विठ्ठल म्हणऊनी मोकलिली थाये। दाही दिशा पाहे वाट त्याची । ऐसे अवस्थेचेनि भरे दाटली गहिवरे । म्हणे भेटी दे रे पंढरीराया ।।६।। तुझी निजदासी नेई चरणांपासी । नागरी परदेसी वाट पाहे ॥७॥