भजनी मालिका
← भजनांकडे परत

एके चरणी नामा दुजे चरणी रामा

eke charani nama duje charani rama

रचनाकार: संत नागरी · अभंग
एके चरणी नामा दुजे चरणी रामा। लोटले सोमा न स्वस्त ।। येरी ते अवधारी आली देहावरी। पावलो सांवरी भयभीत ||१|| सिंणले माझे मन ज्या सुखाकारणे । में आजि पारणे जाहाले देवें ।।धृ।। माझिये जीवीचे सांगो जडभारी । रामया अवधारी मायेचापा । विठोबाची सवे लागलीया मना । फुटला त्यावीण प्राण माझा ||२|| दिवस बारावरी होते त्याचे घरी । सांगती तें करी म्हणीये त्याचे । परी अखंड माझा चित्ती वसे पंढरीनाथ । कीर्तनाचे आर्त संतसंगे ॥३॥ हरिकथेचा सोहळा नाही त्याचा गांवी । खंती माझा जीवी वाटे थोरी।। अनि उदक गोड न वटे मज काही । जीवन माझे नाही कृष्णकथा ||४|| मग आपुले आवडी करून दोघी जणी ।। खेळो अनुदिनी हाचि खेळ ।। विठोबाची मूर्ती करूनि पाहो दृष्टी । मर्ने देऊनी मिठी सुख वाटे ॥५॥ तंबवरी आस धरिली होती म्या मानसी । जंब ये येकादसी माय माझी ।। मी म्हणे सोहळे होती या मनाचे । आर्त कीर्तनाचे पुरेल माझें ॥६॥ परी हे सुखवार्ता नाही त्या देवहंता । तेणे मज चिंता वाटे थोरी ।। ते कस्ट दारुण सांगो मी कोणासी । मग मनें विठोबासी शरण आले ॥७॥ त्या कृपेच्या सागों का विदान केलें । हें मज न कळे मायेबापा ।। आतं पुरविले इतुकेधि भी जाने । परी देखिलें सुख मने बोलता न ये॥८॥ म्हणउनी गहिवरें दाटली मानसी । फुंदे उकसाबुकसी उमज नाही।। निवांत नागरी गिळुनी ठेली वाचा। लोटला सुखाचा माहापूर ।।९।