भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेव तिये घरीची सासुरी दुरळे पे ऐसी

tev tiye gharichi sasuri durale pe aisi

रचनाकार: संत नागरी · अभंग
तेव तिये घरीची सासुरी दुरळे पे ऐसी । म्हणती जाली ईसी भूतबाधा ।। नेघे अन् उदक व्याकुळ मानसी। स्फुंदत उकसाबुकसी प्रेमाछंदे ।। १ ।। परकुळीचे इणे देखिले दैवत । तेणे हिचे चित्त भुलविलें ॥धृ॥ तव ते दुर्जनी बांधली चरणीं । म्हणती हे पळोनी जाईल झणे । नेऊनी भीतरी कोंडिली मंदिरी।। कवाडे बाहेरी अडकुनिया ।।२।। येरी अवस्थाव्याकूळ जाहालीसे मनी । करी चितवाणी देखावया । हरिकथेची सये लागलीया जीवा । गेली देहभावा विसरोनी ।। ३ ।। परा परयंती मध्यमा वैखरी । गिळुनी वाचा य्यारी तन्मय जाली ।। सावळे रूपडे देखे हत्कमळी। निजभावे वोवाळी प्राणनाथा ||४|| आर्त गौरव बोले आवडीचे कळवळे । निवविलें कृपाळें पांडुरंगे । अनाथ नागरी मनेसी येकटी । सांगे सुखगोस्टी अंतरंग ॥५॥