भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी विज्ञाता मनी माध्यान लोटली

aisi vidnyata mani madhyan lotali

रचनाकार: संत नागरी · अभंग
ऐसी विज्ञाता मनी माध्यान लोटली । घूमी जे दाटली निद्रा नयेनी ।। सवेच जागृती सांभाळी परतोनी । तब उभी कीर्तनी माहाद्वारी॥१॥ केले मनोरथ पुरविले गोपाळें । या दीनदयाळे पांडुरंगे।।धृ।। तेणे सुखे दृष्टी न परतेचि पाही । कोंदली हदई प्रेमपुरे ।। विसरोनि देहभाव लोटांगणे घाली ।। निजमायें दीवाळी देवा भक्तां।।२।। तेथे हरिकथाश्रवणें श्रवण माझे घाले । डोळे पे निघाले पाहातां रूपा । नामामृतपान रसने समाधान। प्राण तुळसीसुमकरंदे ।।३।। तपताप विसरली मावळली अहंता । संतांच्या लोळता चरणरजी । आपुल्या ठाई सहजसुख पाली । इंद्रिये निधिली सवासने।।४।। सहित चित्त बुडालें आनंदी । लागली समाधी योगेवीण। स्वप्न ना जागृती नाही देहस्थिती । नाथिली शुषुप्ती तुर्या अवस्छा ||५|| तेथे संकल्प विकल्प भोग्य आणि भोगणें । घ्यावे द्यावे मने कवणाचेनि । बाहेरभीतरी नाही आठवण । सुर्खे त्रिभुवन वोसंडले॥६॥ स्वभक्तपुण्यरासी चिन निर्विकल्प । जो स्वरूपसंकल्प स्वभक्तांचा । सकलनायक दिनांचा कैवारी आर्पिली नागरी प्रेमसुख ।।