भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजि शुभ लवे लोचनु हरिखे

aji shubh lave lochanu harikhe

आजि शुभ लवे लोचनु हरिखे सांगतांहे शकुन स्वप्न देखिलें सुंदरी । अळंकार लेववा चंदन चर्चावा जाति जुती पार्यातिके शेंवरी करा आइती सेजारीं ॥ शेला काढा कां मेचुचा हा दिन दैवाचा । सोहळा तो आमुचा मंदिरींगे माये ॥१॥ गुढिया उभवा मखरें श्रुंगारा भेटी होईल आळंगी । स्फ़ुरण आलें बाहीं क्षेमालागीं पाहीं काचोळी न समाये अंगीगे माये ॥२॥ जिवीं जीव सुंदर त्याचेनि सचार तो मज भेटवा सुखाचा विसावा । सुमनें उकलिलीं नित्य दे माळी उचित करि तथा भावा । आजि वेळु कांवो लाविला नेणें पंथीं सीणला बुझाऊं जाऊं त्याच्या गांवागे माये ॥३॥ ह्रदयी निर्भर प्रेम वारंवार माझें चित्तीं राहो ऐक्य मज । दुजिये वस्तुलागीं रुत जाय माधवी मन्मथ करिताहे वोज । ऐसा विपरीत लाघवी लपे सवेंचि दावी वसिपे चौके । अभ्यासें अंतर पडलें येणें तरि मी त्यजीन जिणें म्हणोनि विनवितसें चतुर सुरेखें । रात्रीचा ठायीं देख मेघशाम बोलला अंबरीगे माये ॥५॥ ऐसिये निवांत मूर्ति ऐकोनि ठेली श्रुती । आकर्षोनी चित्तचैतन्य भरोनि ठेले लोचन ॥ ध्यानीं विसर्जिलें मन परमात्मया रामा तूं एक लाघवी सावेव पावलें ज्ञान । बापरखुमादेविवरा विठ्ठला सुमन संयोगीं आजी सत्य जालें माझें स्वप्नग्वे माये ॥६॥