भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजिचें हें मज तुह्मीं कृपादान । दिलें संतजन मायबापीं

ajichen hen maj tuhmin krupadan | dilen santajan mayabapin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आजिचें हें मज तुह्मीं कृपादान । दिलें संतजन मायबापीं ॥१॥ आलीं मुखावाटा अमृतवचनें । उत्तीर्ण तीं येणें नव्हे जन्में ॥२॥ तुका म्हणे तुह्मीं उदार कृपाळ । शृंगारिलें बाळ कवतुकें ॥३॥