भजनी मालिका

भजने

नाव ठेवीती मजसी विठाबाई म्हणून जन्मशतके सत्रासे चवदा जाण ॥। १॥ आषाढ हो मासी वद्य चतुर्दशी मंगळवारी पाहटे प्रहरासी ॥२॥

रचनाकार: संत विठाबाई

नावडे प्रपंच तापत्रय माया । येईं धांवोनियां केशिराजा ॥१॥ भवभयें फार भ्यालों जन्मांतरा । चौर्‍यांशींचा फेरा बुडवितो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाशवंत देतां ब्रह्म येईल हातां । ऐसी ज्याची कथा पुराणांत ॥१॥ सद्‌‍गुरुचे पायीं देहासि अर्पितां । तात्काळ मुक्तता हातां येते ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाशिवंत देह जाणार जाणार । हा तो निराधार स्वप्नत ॥१॥ अभ्रींची छाया क्षणिक साचार । तैसा हा प्रकार नाशिवंत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाशिवंत देह नाशिवंत माया । नाशिवंत काया काया काज ॥१॥ यमाचा पाहुणा जाणार जाणार । काय उपचार करुनी वायां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाशिवंत देह नाशिवंत माया । नाशिवंत छाया वाया जैशी ॥१॥ म्रुगजळाचे परी नाशिवंत धन । यासी तुं भुलुन गुंतलासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाशिवंत देह मनाचा निश्चय । सद्‍गुरूचे पाय ह्रदयीं असो ॥ १ ॥ कलीमध्यें फार सद्‍गुरू हा थोर । नामाचा उच्चार मुखीं असो ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

नाशिवंत धन नाशिवंत मान । नाशिवंत जाण काया सर्व ॥१॥ नाशिवंत देह नाशिवंत संसार । नाशिवंत विचार न करती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाशिवंत शरीर ओंगळ ओखंटें । परी तया भेटे कर्म धर्म ॥१॥ अशाश्वत शाश्वत हेंचि उमगा मनीं । तया चक्रपाणी धांवे मागें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाशिवंत सर्व एक नाम साचें । म्हणोनि वदा वाचे श्रीराम ॥१॥ शरीर नासे संपत्ति नासे । नाम न नासे श्रीरामाचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाशिवंतासाठीं करितोसी आटी । दृढ धरा कंठीं एक नाम ॥१॥ भवासी तारक विठ्ठलची एक । नाहीं आणिक सुख येतां जातां ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा