भजनी मालिका
← भजनांकडे परत

नावडे पंढरी । कथा करी दारोदारीं

navade pandhari | katha kari darodarin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नावडे पंढरी । कथा करी दारोदारीं ॥१॥ नको त्याचें संभाषण । वाटे भेटीसवें शीण ॥२॥ सांगे ब्रम्हज्ञान वरी नाहीं प्रेम तें अंतरी ॥३॥ निळा म्हणे पोटभरु । उगेंचि करिती गुरुगुरु ॥४॥