भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाशिवंत देह नाशिवंत माया । नाशिवंत छाया वाया जैशी

nashivant deh nashivant maya | nashivant chhaya vaya jaishi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाशिवंत देह नाशिवंत माया । नाशिवंत छाया वाया जैशी ॥१॥ म्रुगजळाचे परी नाशिवंत धन । यासी तुं भुलुन गुंतलासी ॥२॥ व्यापारी बाजारीं घातिलें दुकान । स्ती पुत्र स्वजन तैसे बापा ॥३॥ एका जनार्दनीं ऐशियाच्या छंद । भुलोनी गोविंदा विसरसी ॥४॥