भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाशिवंत सकळीक । शाश्वत माझा नायक

nashivant sakalik | shashvat majha nayak

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाशिवंत सकळीक । शाश्वत माझा नायक ॥१॥ बरवें मजला कळलें । पूर्वपुण्य तें फळलें ॥२॥ प्रपंच अवघा दुःखरूप । सुखरुप आत्मस्वरुप ॥३॥ स्वरुपीं रमल्या भय नाहीं । एक जनार्दनाचे पायीं ॥४॥