भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाशिवंत देह मनाचा निश्चय । सद्‍गुरूचे पाय ह्रदयीं असो

nashivant deh manacha nishchay | sad‍guruche pay hradayin aso

रचनाकार: संत नरहरी · अभंग
नाशिवंत देह मनाचा निश्चय । सद्‍गुरूचे पाय ह्रदयीं असो ॥ १ ॥ कलीमध्यें फार सद्‍गुरू हा थोर । नामाचा उच्चार मुखीं असो ॥ २ ॥ भजनाचा गजर नामाचा उच्चार । ह्रदयीं निरंतर नरहरीचें ॥ ३ ॥