भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाशिवंत देह जाणार जाणार । हा तो निराधार स्वप्नत

nashivant deh janar janar | ha to niradhar svapnat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाशिवंत देह जाणार जाणार । हा तो निराधार स्वप्नत ॥१॥ अभ्रींची छाया क्षणिक साचार । तैसा हा प्रकार नाशिवंत ॥२॥ मृगजळाचें जीवन क्षणिक निर्धार । तैसा हा विचार व्यर्क्थ सर्व ॥३॥ एका जनार्दनीं नाशिवंतासाठीं । केवढी आटाआटी प्राणी करती ॥४॥