भजनी मालिका
← भजनांकडे परत

नावडे जयासी पंढरी । तोचि जाणा दुराचारी

navade jayasi pandhari | tochi jana durachari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नावडे जयासी पंढरी । तोचि जाणा दुराचारी ॥१॥ नावडे जया चंद्रभागा । तोचि अपवित्र पैं गा ॥२॥ नावडे पुंडलिका वंदन । तोचि चांडाळ दुर्जन ॥३॥ नावडे विठ्ठलाची मूर्ति । तोचि जगी पापमति ॥४॥ एका जनार्दनीं शरण । तोचि दुराचारी जाण ॥५॥