भजनी मालिका

भजने

नाम सुलभ सोपें गातां । नाहीं भय आणि चिंता । पळती दोषांच्या चळथा । नाम गातां देशोधडीं ॥१॥ म्हणोनि धरियेली कास । जाहलों संतांचा मी दास । नाम गातां उल्हास । वारंवार मानसीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम हं अमृत भक्तांसी लाधलें । आपण घेतलें बौध्यरुप ॥१॥ नाम हें आळवा नाम हें आळवा । होईल दोहावा कामधेनु ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाम हरिहर संसार तो हरी । सबाह्म अभ्यंतरीं हरि माझा ॥१॥ हरिनाम जपें हरिनाम जपें । ते वर्म सोपें हरि जपें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम हें अमृत भक्तासी दिधलें । ठेवणें ठेविलें होतें गुप्त ॥१॥ प्रत्यक्ष अवतार धरिला अलंकापुरी। मार्ग तो निर्धारी दाखविला ॥२॥

रचनाकार: संत सेना

नाम हे नगरी वैकुंठ पंढरी । नांदता श्रीहरी पांडुरंग ॥ १ ॥ नरदेहीं जन्मले पंढरीस गेले । दृष्टीभरि पाहिले पांडुरंग ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

नाम हे नौका तारक भवडोहीं । म्हणोनि लवलाही वेग करा ॥१॥ बुडतां सागरीं तारुं श्रीहरी । म्हणोनि झडकरी लाहो करा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम हें पावन नाम हें पावन । दुजा ठाव आन नाहीं येथें ॥१॥ देखेणाही झाला देखणाही झाला । देखणाही झाला अंधत्वेसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम हें सोपें जपतां विठ्ठल । अवघेंचि फळ हातां लागे ॥१॥ योग याग जप तप अनुष्ठान । तीर्थ व्रत दान नाम जपतां ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

नाम ह्मणावया तूं कांरे करंटा । काय तुझे अदृष्टां लि-हिलें असे ॥१॥ यमाचे यमपाश पडतील गळां । जाशील सगळा काळामुखीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामचि एक विठोबाचें । अवघ्या साधनाचें शिरोरत्न ॥१॥ उच्चार मात्र करितां ओठी । प्रगटे पोटीं हरिरुप ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नामचि तो जाणे आन कांहीं नेणें । संसार नामाविणें जाईजेना ॥१॥ नाम स्मरे त्यांसी संसारचि नाहीं । खुंटली ते पाही वेरझार ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामचि हें आहे पंचतत्त्वा ठाव । नाहीं दुजा भाव देखावया ॥१॥ देखणारा जाहाल कर्पुराची वाती । नामाग्निं विश्रांती ठाई जाहाली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामचिंतनें जडली प्रीती । भगवदभावना सर्वभूतीं ॥१॥ हेचि परमार्थ साधन । मुखीं नाम ह्रदयीं ध्यान ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नामचेनि पाठें जाती पैं वैकुंठी । आणिक खटपटी न तरती ॥१॥ आठवा नामपाठ आठवा नामपाठ । वाउगा बोभाट करुं नका ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामदेव घरीं पाहुणे मेहुणे । आले दोघेजण पंढरिसी ॥१॥ राजाईनें बंधु देखुनि दृष्टिसी । उल्हास मानसीं थोर जाला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामदेवा काय करिसी तीळ । उभा अगा ठेलासी दर्भ जैसा ॥१॥ भुका कागा मरसी जेथिंचा तेथें । केशवराज तूतें आतुडेना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव