भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामचिंतनें जडली प्रीती । भगवदभावना सर्वभूतीं

namachintanen jadali priti | bhagavadabhavana sarvabhutin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नामचिंतनें जडली प्रीती । भगवदभावना सर्वभूतीं ॥१॥ हेचि परमार्थ साधन । मुखीं नाम ह्रदयीं ध्यान ॥२॥ विषय भोगीं विलोभता । मोह न बाधी त्या ममता ॥३॥ निळा म्हणे निजध्यासें । झाले मुक्त शुकाऐसे ॥४॥