भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामदेवा काय करिसी तीळ । उभा अगा ठेलासी दर्भ जैसा

namadeva kay karisi til | ubha aga thelasi darbha jaisa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामदेवा काय करिसी तीळ । उभा अगा ठेलासी दर्भ जैसा ॥१॥ भुका कागा मरसी जेथिंचा तेथें । केशवराज तूतें आतुडेना ॥२॥ नाहीं दया ध्यान ईश्वरीं भजन । वायांविण प्राण कां करितीसी ॥३॥ हरिभक्तिविण जन्मालासी नरू । म्हणे विसोबा खेचरू अरे नाम्या ॥४॥