भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामदेव म्हणे देवा । ब्रह्मज्ञान पोटीं ठेवा

namadev mhane deva | brahmadnyan potin theva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामदेव म्हणे देवा । ब्रह्मज्ञान पोटीं ठेवा ॥१॥ तुम्ही मायेसंगें गूढ । ज्ञान जाणिवेचें आड ॥२॥ आम्हां नाहीं याची चाड । संतभेटी गोड ॥३॥ संटभेटी प्रेम फावे । प्रेमें देवाशीं भेटावें ॥४॥ प्रेम आहे पोटभरी । देव त्यासी पोटीं धरी ॥५॥ नामदेवा ठायीं प्रेम । मार्गीं आडविलें ब्रह्म ॥६॥